शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात तब्बल १४ कोटींचे बंदी असलेले "अल्प्राझोलम"पकडले...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात तब्बल १४ कोटींचे बंदी असलेले "अल्प्राझोलम"पकडले...

श्रीरामपुरात तब्बल १४ कोटींचे बंदी असलेले "अल्प्राझोलम"पकडले...

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात काल रात्री श्रीरामपूर शहर पोलिसांनी एका छोटा हत्तीमध्ये सुमारे १४ कोटी रूपयांचे ड्रग्ससह मुद्देमाल जप्त केला आहे. हा साठा पकडल्यानंतर आज गुरुवार दि.१५ मे रोजी याबाबत एसपी राकेश ओला यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबतची माहिती दिली. पकडलेला आरोपी मिनीनाथ विष्णू राशिनकर, वय-३८, रा. धनगरवाडी, ता. राहाता याची पोलीस कोठडी घेतल्यानंतर अधिक तपासात हा माल कोठून आला? कोठे चालला होता? याची माहिती मिळेल असे एसपी राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

       याबाबतची अधिक माहिती अशी की, डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुंजे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काल रात्री एमआयडीसी परिसरात दिघी-खंडाळा रोडवर पोलिसांनी छोटा हत्ती टेम्पो क्र.एमएच २० बीटी ०९५१ हा टेम्पो पकडला. यावेळी मिनीनाथ राशिनकर हा टेम्पो चालवत होता. या टेम्पोमध्ये २१ पांढऱ्या रंगाच्या गोण्या आढळून आल्या. त्यापैकी १४ गोण्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आणि ७ गोण्यांमध्ये पांढऱ्या रंगाचे स्पटीक दिसून आले. हे स्पटीके अल्प्राझोलम औषधाचे असून गोण्यांमधील पांढरी पावडर ही अल्प्राझोलम बनवण्याकरीता लागणारा कच्चा माल असल्याचे ड्रायव्हरने सांगितले. 

         अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने आणि त्याच्यावर बंदी असल्याने पोलिसांनी हा कच्चा माल ताब्यात घेतला. यात ६ कोटी ९७ लाख ६७ हजार रूपयांचे अल्प्राझोलमचे स्पटीक तसेच ६ कोटी ७६ लाख ७४ हजारांचे अल्प्राझोलम बनवण्याची पावडर आणि १ लाखांचा छोटा हत्ती असा १३ कोटी ७५ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी मिनीनाथ राशिनकर, रा. धनगरवाडी, तसेच विश्वनाथ कारभारी शिपणकर, रा.दौड, जि.पुणे यांच्याविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला एनडीपीएस कलम ८ (क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याचे एसपी ओला यांनी सांगितले.

        या पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, डिवायएसपी बसवराज शिवपुजे, पोनि. नितीन देशमुख, सहा. पोनि.गणेश जाधव, पोउनि. रोशन निकम,रोहिदास ठोंबरे,दिपक मेंढे पाटील ,मगरे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.