शिवप्रहार न्युज - शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी नामदार विखे पाटील...

शिवप्रहार न्युज -  शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी नामदार विखे पाटील...

शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी नामदार विखे पाटील...

शिर्डी- नगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

       या पत्रामध्ये जिल्हाधिकारी,नगर यांना सहअध्यक्ष शिर्डी संस्थान असे दाखवण्यात आले असून संगमनेर,कोपरगाव,शिर्डीचे आमदार यांना सदस्य तसेच शिर्डीचे नगराध्यक्ष यांना देखील सदस्य आणि संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सचिव म्हणून या पत्रामध्ये उल्लेखण्यात आले आहे.सदर पत्र विधी व न्याय विभागाकडून काढण्यात आल्याचे समजत आहे.