शिवप्रहार न्युज - अल्पवयीन मुलीवर महिलेच्या मदतीने सामुहीक बलात्कार!

अल्पवयीन मुलीवर महिलेच्या मदतीने सामुहीक बलात्कार!
अहिल्यानगर ( शिवप्रहार न्युज) जिल्ह्यातील पाथर्डी परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षे वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका महिलेच्या मदतीने चौघांनी सामुहीक बलात्कार करण्याचा भयंकर प्रकार घडला असून या घटनेने पाथर्डी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने पाथर्डी पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी महीला प्रणाली गुलाबचंद खाटेर,कपील सातिवाचंद आग्रवाल,जय बाळासाहेब शहाणे, देवेंन्द्र गुलाबचंद खाटेर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहीता कलम ६४ (१),६५ (१ ),७० (२ ) , ३५२ (२ ) बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम ४,६,८ ,१७ प्रमाणे गुन्हा दाखवल झाला आहे.
पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे की,पार्लरचे काम शिकण्यास जात असतांना प्रणाली गुलाब खाटेर हि म्हणाली की, तुला जोड धंदा शिकवते असे बोलून तिच्यावर वर नमूद आरोपी कपील,जय,देवेंन्द्र यांनी वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केला. पार्लर शिकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अशाप्रकारे सामुहीक बलात्कार झाला तेही महिलेच्या साथीने.या प्रकरणी डीवायएसपी पाटील हे पुढील तपास करीत आहेत. अरोपींचा पोनि मुटकुळे व पथक हे कसून शोध घेत आहे.