शिवप्रहार न्युज - "माय डार्लींग" म्हणत श्रीरामपुरात विद्यार्थिंनीचा विनयभंग...

"माय डार्लींग" म्हणत श्रीरामपुरात विद्यार्थिंनीचा विनयभंग...
श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) श्रीरामपुरात माय डार्लिंग असे म्हणत विद्यार्थिनीचे कपडे फाडून,विनयभंग करण्याची खळबळजनक घटना घडल्याने वार्ड नं.२ परिसरात महीला-मुलींमध्ये घबराट पसरली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर शहरात उर्दु शाळेजवळ बिफ मार्केट परिसरात ( वार्ड नं २ ) येथे एक १५॥ वर्षाची अल्पवयीन विद्यार्थिनी कचरा टाकण्यासाठी जात असतांना रेहान शब्बीर शेख ,आयान शब्बीर शेख हे म्हणाले," माय डार्लिंग! माय डार्लींग!!"तेव्हा विद्यार्थीनीने या टाँन्ट बद्दल जाब विचारला असता आरोपी शब्बीर मुबारक शेख म्हणाला हिचे कपडे फाडा.तेव्हा रेहानने धक्का देवून विनयभंग केला व रेहान व आयान यांनी विद्यार्थीनीचे कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. तसेच चापटीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली .
याबाबत पीडित विद्यार्थिनीने शहर पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी रेहान शब्बीर शेख,आयान शब्बीर शेख, शब्बीर मुबारक शेख,सर्व राहणार- उर्दु हायस्कुल,बिफ मार्केटजवळ,वार्ड नं २,श्रीरामपूर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहीता कलम ७४,७६,११५(२),३५२ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम ८,१२ प्रमाणे काल रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान शहराचे कर्तव्यदक्ष पोनि.नितिन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा महिला पोसई देवरे या शोध घेत आहेत. आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे.