शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरातून विद्यार्थीनीला शिर्डीत नेत बलात्कार ...

श्रीरामपुरातून विद्यार्थीनीला शिर्डीत नेत बलात्कार ...
श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) एका कॉलेज विद्यार्थीनी बरोबर मोबाईलवर स्नॅपचॅटव्दारे मैत्री करून तिच्यावर शिर्डीत बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.
या गंभीर घटनेची अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर शहरातील नेवासारोड वरील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका १७॥ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थीनीशी स्नॅपचॅट या सोशल मेडिया ॲपव्दारे ओळख करून आरोपी गजानन मनोहर देशमुख याने विद्यार्थीनीला कॉलेज गेटवर भेटून,आपण शिर्डीला दर्शनाला जावू असे म्हणाला.त्यावर ती विद्यार्थीनी नाही म्हणाली तर मैत्रीचे कारण सांगत आरोपीने तिला शिर्डीला नेले.तेथे एका लॉजवर नेवून विद्यार्थिनीवर बळजबरीने शारीरीक संबंध करून बलात्कार केला.
तसेच नंतर पुन्हा एकदा कॉलेजच्या गेटवर येवून, मोबाईल मधील उघडे फोटो दाखवून हे तुझे आई-वडीलांना सांगेल,भाऊ,नातेवाईक,मित्रांना दाखवील अशी धमकी देवून पुन्हा शिर्डीत नेवून लॉजमध्ये बलात्कार करून दमदाटी केली.वरीलप्रमाणे पीडीत विद्यार्थिनीने श्रीरामपूर शहर पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी गजानन देशमुख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४,३५१,(२) पोस्को कायदा कलम ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पोनि.नितीन देशमुख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास चक्रे फिरवून आरोपी गजानन देशमुख याला अटक केली असून तो वाशिम जिल्हयातील आहे.पुढील तपास पोसई देवरे या करीत आहे.मोबाईलमुळे मुली-महिलांबाबत कशा अत्याचाराच्या घटना घडत आहे हे पुन्हा एकदा या घटनेतून समोर आले आहे.या घटनेने पालक वर्ग व विद्यार्थीनींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.