शिवप्रहार न्यूज- उदयपूर व अमरावती येथील हिंदू तरुणांच्या निर्घृण हत्या प्रकरणाबाबत पोलिसांना निवेदन…

शिवप्रहार न्यूज- उदयपूर व अमरावती येथील हिंदू तरुणांच्या निर्घृण हत्या प्रकरणाबाबत पोलिसांना निवेदन…

उदयपूर व अमरावती येथील हिंदू तरुणांच्या निर्घृण हत्या प्रकरणाबाबत पोलिसांना निवेदन…

नेवासा-आज सोमवारी नेवासा येथील हिंदू तरुणांच्या वतीने खालीलप्रमाणे निवेदन पोलीसांना देण्यात आले आहे.

 राजस्थान येथील उदयपूर मध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ टाकलेल्या सोशल मिडीया पोस्टमुळे कन्हैय्या लाल

या हिंदू युवकाची भर दिवसात दुकानात घुसून जिहादी मानसिकतेच्या धर्माधांकडून निर्घुण हत्या करण्यात आली आणि सदर हत्येचा व्हिडीओ देखील समाज माध्यमांद्वारे प्रसारित करुन एक दहशदीचे वातावरण तयार करण्यात आले.तसेच महाराष्ट्रामधील अमरावतीमध्ये उमेश कोल्हे या युवकाची सुध्दा हत्या झाली असुन त्याची सुध्दा योग्य चौकशी करून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी. सदर दोन्ही घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.

         राजस्थानमध्ये जो प्रकार घडला अशा जिहादी मानसिकतेचा युवक रियाज व गौस महंमद यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहोत. तसेच आतंकवादी ईस्लामीक संघटन पापुलर फ्रंट ऑफ इंडीया या संघटनेवर देशभर बंदी घालण्यात यावी.

कायदयाचा कोणताही धाक आम्हाला नाही व आम्ही कायदा मानतच नाही. अशा प्रकारचा तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. त्या व्हिडीओमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धमकावण्यात आले आहे. गतवर्षापासुन राजस्थान मधील हिंदू समाजाला आतंकीत व प्रताडीत करण्यात येत आहे. राजस्थानमध्ये योजनाबध्द पध्दतीने हिंदुंवर हल्ले होत आहेत. अशा या राजस्थान सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती शासन लागू करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.