शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यात नवरा-बायकोचा मासेमारी करताना बंधा-यात बुडून मृत्यू..

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यात नवरा-बायकोचा मासेमारी करताना बंधा-यात बुडून मृत्यू..

श्रीरामपूर तालुक्यात नवरा-बायकोचा मासेमारी करताना बंधा-यात बुडून मृत्यू...

श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी या गावात असणाऱ्या अशोक बंधारा येथे आज दुपारी मंजाबापू गायकवाड, वय 37 व चंद्रकला गायकवाड,वय 30 हे कुटुंब मासेमारी करण्यासाठी गेले होते. पाण्याच्या प्रवाहामुळे व खोली मुळे त्यांचा पाण्यात तोल जाऊन ते दोघे पाण्यात बुडून मयत झाले आहेत.

          माळेवाडी बंधारा भागात पोलिस त्या दोघांचे प्रेत शोधण्याचे मोठे शोध कार्य करत होते.या शोध मोहिमेत पोलिसांना यश आले आहे.

       या घटनेमुळे माळेवाडी भागात हळहळ व्यक्त होत आहे.