शिवप्रहार न्युज - टायर फुटून अपघात; गोंडेगावच्या महिलेचा मृत्यू...

शिवप्रहार न्युज -  टायर फुटून अपघात; गोंडेगावच्या महिलेचा मृत्यू...

टायर फुटून अपघात; गोंडेगावच्या महिलेचा मृत्यू...

    श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथून नेवाशाच्या दिशेने निघालेल्या स्विफ्ट कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात गोंडेगाव येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिला ठार होण्याची घटना काल रविवारी दुपारी नेवासा-श्रीरामपूर रोडवर नेवासा हद्दीत घडली. गोंडेगाव येथील मिराबाई गणपत फोपसे यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

           अपघातग्रस्त स्विफ्ट कार क्र. एमएच १७ सीआर ११२३ मध्ये दोन महिलांसह एक लहान बाळ व एक पुरूष होते.बाकीची परिवारातील मंडळी सुखरुप असल्याची माहिती पोलीसांनी दिली.सदर कारमधील सदस्य हे काल रविवारी दुपारी गोंडेगावहून आपल्या पाहुण्याकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजते.