शिवप्रहार न्युज - शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी कसायांच्या तावडीतून निमगाव-खैरीला वाचवल्या ०३ गोमाता...

शिवप्रहार न्युज -  शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी कसायांच्या तावडीतून निमगाव-खैरीला वाचवल्या ०३ गोमाता...

शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी कसायांच्या तावडीतून निमगाव-खैरीला वाचवल्या ०३ गोमाता...

श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव-खैरी येथील हिंदुत्ववादी नेते, शिवछत्रपतींचा मावळा,राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष निलेशभाऊ परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी काल रात्री ०३ गोमातांना कसायांच्या तावडीतून वाचवून जीवनदान देण्यात मोलाचे योगदान दिले.

        याबाबत अधिक माहिती अशी की,राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष निलेश भाऊ परदेशी यांना एका मावळ्याचा फोन आला की,श्रीरामपूर-पुणतांबा रोडवर चितळीकडून श्रीरामपूरच्या दिशेने गोमातांना छोटा हत्ती टाटागाडी मधून कत्तलीसाठी श्रीरामपूरला नेले जात आहे.तरी काल सोमवारी रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास श्री.निलेश परदेशी यांनी तात्काळ या रोड वरून जाणाऱ्या गोमातांच्या गाडी क्र.एम.एच.१७ एजी ३९६ हिला स्वतःचे प्राण धोक्यात घालून पकडले.त्यानंतर त्यांनी तात्काळ शिवप्रहारचे कार्याध्यक्ष श्री.चंद्रशेखर(चंदू)आगे यांना संपर्क केला.दरम्यान त्यांनी लागलीच पोलिसांना कळविण्यात येऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

         पोलीसांनी या कसायांना ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनला नेले. या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,डीवायएसपी श्री.बसवराज शिवपुजे ,पीआय श्री.दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई चालू आहे.

         तरी युगप्रवर्तक,युगपुरुष,छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोरक्षणाच्या विचारांचे मावळे बनुन राजमुद्रा ग्रुप व शिवप्रहारच्या सदस्यांनी सतर्कता दाखवल्यामुळे ०३ गोमातांचे प्राण वाचले.