शिवप्रहार न्यूज- पेट्रोल पंप मालकाने केला महिलेचा विनयभंग;श्रीरामपूरात गुन्हा दाखल...

शिवप्रहार न्यूज- पेट्रोल पंप मालकाने केला महिलेचा विनयभंग;श्रीरामपूरात गुन्हा दाखल...

पेट्रोल पंप मालकाने केला महिलेचा विनयभंग;श्रीरामपूरात गुन्हा दाखल...

श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान परिसरात असणाऱ्या साई पेट्रोलियम नावाच्या पेट्रोल पंपाचा मालक पोपट बारहाते याने पेट्रोल पंपा शेजारी राहणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

      काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पेट्रोलपंप परिसरात पाणी साचल्याने झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समजत आहे. तसेच आरोपी बारहाते याने पिडीत महिलेला व तिच्या सासूला शिवीगाळ,मारहाण व धक्काबुक्की देखील केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

       या घटनेवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये काल रात्री उशिरा गुन्हा रजिस्टर नंबर 196/2021 भादवि कलम 354,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.