शिवप्रहार न्युज - अपघातग्रस्तांना श्रीरामपूर RTO ची मदत...

अपघातग्रस्तांना श्रीरामपूर RTO ची मदत...
राहता (शिवप्रहार न्यूज)- राहता तालुक्यातील अस्तगाव फाटा येथे दुपारी अज्ञात कारने मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील एक महिला व पुरुष हे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले होते. याच दरम्यान श्रीरामपूर आरटीओचे श्री.हेमंत निकुंभ सोमोवानी, बनकर, नागवे हे तपासणी दरम्यान तिथून जात असताना त्यांनी अपघातग्रस्तांना पाहिले. लगेचच त्यांनी तातडीने या अपघातग्रस्तांना उपचाराकरिता शासकीय वाहनात बसवून राहता येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात मोटारसायकल वरील महिला व पुरुषाला चांगलाच मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना आरटीओमुळे तात्काळ मदत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.