शिवप्रहार न्युज - श्रीसाईबाबा मंदिर बॉम्बने उडविण्याची धमकी! शिर्डीच्या विमानात हवाईसुंदरीचा विनयभंग!! 

शिवप्रहार न्युज -  श्रीसाईबाबा मंदिर बॉम्बने उडविण्याची धमकी! शिर्डीच्या विमानात हवाईसुंदरीचा विनयभंग!! 

श्रीसाईबाबा मंदिर बॉम्बने उडविण्याची धमकी! शिर्डीच्या विमानात हवाईसुंदरीचा विनयभंग!! 

शिर्डी ( शिवप्रहार न्युज) कोट्यावधी भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीतील श्री.साईबाबांचे समाधी मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञात आरोपीने ईमेलव्दारे श्रीसाईबाबा संस्थानच्या मेल ॲड्रेसवर मेल पाठवून दिली आहे.या प्रकाराने भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मंदिर सुरक्षा प्रमुख पोउनि रोहीदास माळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भा. न्या. सं . कलम ३५१ (४) प्रमाणे शिर्डी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . एसपी राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक कलुबर्मे यांनी परिसरात भेट दिली असून पोनि गलांडे व पोसई जाधव हे पुढील तपास करीत आहेत. 

        दरम्यान दुसरी खळबळजनक घटना शिर्डीत इंडिगो विमानात घडली असून हवाई सुंदरीला आरोपी प्रवासी संदिप सुमेर सिंग(रा. राजस्थान ) याने एकदा नव्हे तर दोनदा कमरेखाली हात लावून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विमानातच विनयभंग केला. या प्रकरणी इंटर ग्लोबल एव्हीएशन प्रा.लि. इंडीगोचे कर्मचारी संतोष चौरे ( शिर्डी विमानतळ ) यांच्या फिर्यादीवरून आरोपी संदिप सिंग याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.पोनि चव्हाण यांच्या मागर्दशनाखाली सफौ.पेटारे हे पुढील तपास करीत आहे . या घटनेने विमानातही तरुणी सुरसुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.