शिवप्रहार न्युज - ०४ महिन्यात पालिका निवडणुका घ्या-सुप्रीम कोर्टाचे निर्देश...

०४ महिन्यात पालिका निवडणुका घ्या-सुप्रीम कोर्टाचे निर्देश...
दिल्ली/मुंबई - गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका, महानगरपालिका,जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ०४ महिन्याच्या आत घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहे.
दरम्यान या निर्देशामध्ये सुप्रीम कोर्टाने असे म्हटले आहे की,चार आठवड्यात या संदर्भातली अधिसूचना देखील काढा.तसेच २०२२ पूर्वीप्रमाणे ओबीसी आरक्षण देखील कायम ठेवण्याचे यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.०४ महिन्यात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यामुळे आता निवडणुका तात्काळ लागणार अशी परिस्थिती दिसते.