शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात भावी डॉक्टरची आत्महत्या...

श्रीरामपुरात भावी डॉक्टरची आत्महत्या...
श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव या गावचे मूळ रहवासी व सध्या श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरात वास्तव्यास असणारे अक्षय अनिल पावसे या डॅाक्टरीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने अशोकनगर भागात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,काल बुधवारी सकाळी अक्षय याने एका एक्सप्रेस रेल्वे खाली घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली.या रेल्वेच्या धडकेमुळे अक्षय याच्या मृतदेहाची ओळख पटत नव्हती.नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर शहरात आणल्यावर त्याची ओळख पटली.
हा तरुण श्रीरामपुरात वैद्यकीय शिक्षण घेत होता.भविष्यात डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याचे वडील देखील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असून ते श्रीरामपुरात लॅब चालक आहेत.