शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात चादर मिरवणुकीत भगवा झेंडा पाडण्याचा प्रयत्न...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात चादर मिरवणुकीत भगवा झेंडा पाडण्याचा प्रयत्न...

श्रीरामपुरात चादर मिरवणुकीत भगवा झेंडा पाडण्याचा प्रयत्न...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 मध्ये केजीएन ग्रुपच्या वतीने हजरत काजी बाबा चादर मिरवणूक सुरू होती. ही मिरवणूक बजरंग चौकात आली असता मिरवणुकीतील एकाने त्याच्या हातातल्या हिरव्या झेंड्याने हनुमान मंदिरासमोर असलेल्या जय बजरंग तरुण मंडळाच्या फलकावर लावलेला भगवा झेंडा खाली पाडण्याचा प्रयत्न करून हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वर्तन केले.

      याप्रकरणी रामा उत्तम भालेराव या तरुणाने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून केजीएन ग्रुपचा अध्यक्ष इमरान महंम्मद जहूर ताडे आणि झेंडा फिरवणारा अनोळखी अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोनि.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.