शिवप्रहार न्युज - विनयभंग करून महिलेच्या पतीच्या डोक्यात कोयता मारणाऱ्याची श्रीरामपूर पोलिसांकडून धिंड...

विनयभंग करून महिलेच्या पतीच्या डोक्यात कोयता मारणाऱ्याची श्रीरामपूर पोलिसांकडून धिंड...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात एका महिलेचा विनयभंग करत तिच्या पतीच्या डोक्यात कोयत्याने मारहाण करणाऱ्या आरोपीची आज श्रीरामपूर शहर पोलिसांनी तपासाकामी बाजारपेठेत धिंड काढली.
श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात गणेश मुंढे (रा. भीमनगर, वार्ड नंबर 6, श्रीरामपूर, प्रशांत भांड (रा. गिरमे चौक वार्ड नंबर 3, श्रीरामपूर) आणि एक अनोळखी अशा तिघांनी रविवार दिनांक 27 रोजी रात्री नऊ वाजता एका महिलेच्या घरी जाऊन तुझा पती कुठे आहे असे म्हणत महिलेला शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला होता. तसेच त्यानंतर आलेल्या तिच्या पतीला देखील मारहाण करत त्याच्या डोक्यात कोयता मारून त्याला गंभीर जखमी करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले होते. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात विनयभंगासह मरहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी प्रसाद उर्फ प्रशांत मनोज भांड याची शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पकडून आज शुक्रवारी शहरातील मुख्य रोडरील बाजारपेठेत धिंड काढली. यामुळे गुंडगिरी, गुन्हेगारी करणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.