शिवप्रहार न्यूज -नगराध्यक्षांच्या ड्रायव्हरने यादीत नाव नसतांना कोरोना लसीकरण रांगेत एका समर्थक ला घुसवले;353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी.

नगराध्यक्षांच्या ड्रायव्हरने यादीत नाव नसतांना कोरोना लसीकरण रांगेत एका समर्थक ला घुसवले;353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी...
श्रीरामपूर- श्रीरामपूर नगरपालिकेच्या मेन रोड वरील वाचनालयामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या मार्फतीने कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. या केंद्रावर प्रांत अधिकारी यांना काँग्रेस शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या असे निदर्शनास आले की,नगराध्यक्ष यांचे वाहन चालक यांनी एका नगराध्यक्ष “समर्थक” इसमास नगरपालिकेने जाहीर केलेल्या यादीत त्याचे नाव नसतानादेखील रांग मोडून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून लस देण्यास भाग पाडले. यावेळी ज्येष्ठ नागरिक हे लस घेण्यापासून साठी तासनतास रांगेमध्ये उभे होते. असा आरोप उपनगराध्यक्ष श्री.ससाणे यांनी केला आहे.
सदर प्रकार स्पष्ट झाल्यानंतर उपनगराध्यक्ष श्री.ससाणे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.गुजर ,काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री.छल्लारे यांनी या कृत्यास हरकत घेतली. त्यानंतर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या “ समर्थक” व्यक्तीचे नाव नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीत नसल्याचे सांगितले.
या सर्व प्रकाराचा निषेध करीत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी,प्रांत अधिकारी यांच्याकडे शासकीय कामात अडथळा आणला म्हणून नगराध्यक्षा यांचे ड्रायव्हर व समर्थकांवर 353,34 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेने श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.