शिवप्रहार न्यूज-श्रीरामपूरात पालिका निवडणूकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर…

शिवप्रहार न्यूज-श्रीरामपूरात पालिका निवडणूकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर…

श्रीरामपूरात पालिका निवडणूकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर…

श्रीरामपूर -नगरपरिषदेच्या हद्दीतील अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अंतिम अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली आहे.

       श्रीरामपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक सन २०२२ साठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार प्रभाग रचना जाहीर करून त्यावर नागरीकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. सदर हरकती घेण्यास मुदत देण्यात आली होती. मुदतीत आलेल्या हरकतींवर नुकतीच सुनावणी झाली. काही भाग चुकीच्या पद्धतीने तोडले गेले तर काही भाग चुकीच्या पद्धतीने जोडले गेले, असे आक्षेप काहींनी घेतले होते. आक्षेपांची सत्यता पडताळून निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यावर निर्णय दिले आहे.    

        आज श्रीरामपूर शहरातील नगरपालिकेच्या प्रभार रचनांची अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आता जे प्रभाग जाहीर करण्यात आले आहे त्यात कुठलाही बदल होणार नसल्याने समजते.