शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर बस स्थानकावर महिलेचे मंगलसूत्र चोरले...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूर बस स्थानकावर महिलेचे मंगलसूत्र चोरले...

श्रीरामपूर बस स्थानकावर महिलेचे मंगलसूत्र चोरले...

    श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरात राहणाऱ्या एका महिलेचे बस स्थानकावर बसमध्ये चढताना अज्ञात चोरटयाने मंगळसूत्र चोरून नेण्याचा प्रकार काल रविवार दि. ४ मे रोजी दुपारी घडला आहे. 

     याबाबत अधिक माहिती अशी की, पुष्पा अनिल खंडागळे, वय-३६, व्यवसाय-गृहिणी, रा. कुंभार गल्ली, वॉर्ड नं. ३, श्रीरामपूर या काल रविवारी दुपारी आपले पती, मुलगा व मुलगी यांच्यासह कोपरगावला जाण्यासाठी श्रीरामपूर बस स्थानकावर गेल्या होत्या. बसस्थानकावर कोपरगावला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरटयाने पुष्पा खंडागळे यांच्या गळयातील मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेवून कशानेतरी कट करून चोरून नेले आहे. 

      याप्रकरणी पुष्पा खंडागळे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात काल फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरटयाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. भडकवाड हे करीत आहेत. श्रीरामपूर बस स्थानकावर वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे.