शिवप्रहार न्यूज- तपासायला आलेल्या नवविवाहित तरुणीला डॉक्टरने मारली मिठी!

तपासायला आलेल्या नवविवाहित तरुणीला डॉक्टरने मारली मिठी!
नगर (शिवप्रहार न्यूज)- नगर जिल्ह्यातील कर्जत शहरात असलेल्या पवार हॉस्पिटलमध्ये एक बावीस वर्षाची नवविवाहित तरुणी डॉक्टर दयानंद पवार याच्याकडे छाती दुखत असल्याने तपासणीसाठी गेली होती. यावेळी डॉक्टर दयानंद पवार याने सदर तरुणीला तपासण्याच्या खोलीत नेऊन तिची छाती तपासली त्यानंतर मला आणखी तपासावे लागेल असे सांगत कपड्याचे बटन काढायला सांगून डॉक्टरने नको ती तपासणी करत तरुणीला धरून लज्ज उत्पन्न असे वर्तन करून विनयभंग केला.
तरुणी घाबरूण उठली व कपडे सावरत डॉक्टर तुम्ही हे काय करता? असे म्हणाली तेव्हा लींग पीसाट डॉक्टर दयानंद पवार तिला पुन्हा मिठी मारून नेमकी छाती कशी दुखते हे पाहू असे म्हणत तुझी जर काही तक्रार नसेल तर मी तुझी सर्व डिलिव्हरी नॉर्मल करील, तुझी सगळी सेवा करीन असे म्हणत या लिंगपिसाट डॉक्टर दयानंद पवार याने गर्भवती असलेल्या तरुणीचा रुग्णालयातच भर दुपारी काल दोन वाजता हा विनयभंग केला. डॉक्टरचे हे सैतानी रुप पाहून घाबरलेल्या तरुणीने बाहेर आल्यानंतर घडलेला प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला. नवऱ्याने लगेच तातडीने पत्नीसह कर्जत पोलिसांत जाऊन फिर्याद दिली.
विवाहित तरुणीने कर्जत पोलिसांत फिर्याद दिल्यावरून स्त्री रोग तज्ञ असलेला आरोपी डॉक्टर दयानंद पवार यांच्याविरुद्ध भादवि कलम 354, 354-अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी भेट दिली. या गंभीर गुन्ह्याचा पोलीस कसून तपास करीत आहे. या घटनेने महिला वर्गात खळबळ उडाली असून हा डॉक्टर अनेक वर्षांपासून महिला रुग्णांवर उपचार करतो. त्यामुळे त्याने असे किती वाईट कृत्य केले. याची चर्चा सुरू झाली असून त्या डॉक्टरवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे. या डॉक्टरचे मोठे हॉस्पीटल असून डॉक्टरी पेशाला या पवार नामक डॉक्टरने काळीमा फासली आहे.