शिवप्रहार न्युज - नरसरीजवळ बस-मोटारसायकलचा अपघात; ०१ ठार

शिवप्रहार न्युज - नरसरीजवळ बस-मोटारसायकलचा अपघात; ०१ ठार

नरसरीजवळ बस-मोटारसायकलचा अपघात; ०१ ठार

    श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपुर - देवळाली रोडवरील नरसरीजवळ बस आणि मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना काल बुधवारी रात्री घडली आहे. रामेश्वर कांतीलाल जगताप (वय-४८) राहणार कोपरे, ता. राहुरी असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काल बुधवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान नरसरी जवळ रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात झाला. अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेला पाचारण करून मदतकार्य केले. जखमींला रुग्णवाहिकेत राहुरी सरकारी रुग्णालय दाखल केले.मात्र डॉक्टरांनी उपचारापुर्वी मंयत घोषित केले. 

         दरम्यान आज गुरुवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छछेद करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयताच्या पाठीमागे आई, पत्नी, दोन मुले, भाऊ-भावजय असा परिवार आहे. सदर घटनेने कोपरे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.