शिवप्रहार न्यूज- तुषारच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली; श्रीरामपूर ता.पो.ठाण्यात गुन्हा दाखल….

तुषारच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली; श्रीरामपूर ता.पो.ठाण्यात गुन्हा दाखल….
श्रीरामपूर- तालुक्यातील वाकडीफाटा येथे बसस्टॅन्डजवळ तुषार बाळासाहेब शेळके, वय-२८, धंदा-शेती, रा.शेळकेवस्ती, वाकडी हा तरूण उभा असताना तेथे येवून भावबंध आरोपी आनंद शेळके, अक्षय शेळके, संतोष शेलार यांनी तू येथे थांबू नको, येथून निघून जा, असे म्हणत शिवीगाळ करून तुषार शेळकेच्या डोक्यात बिअरची बाटली मारून फोडली, काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
भर दुपारी ४ वा. वाकडीफाटा बसस्टॅन्डसमोर हा प्रकार घडला. जखमी तुषार बाळासाहेब शेळके याच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलिसात मारहाण करणारे आरोपी आनंद लक्ष्मण शेळके, अक्षय बाबासाहेब शेळके, दोघे रा. शेळकेवस्ती, वाकडी, संतोष कारभारी शेलार, रा.जळगाव, ता. राहाता यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ.आडांगळे हे पुढील तपास करीत आहेत.