शिवप्रहार न्युज - बेलापूर येथील संदिप ढोलचे धनवटे यांची आत्महत्या…

बेलापूर येथील संदिप ढोलचे धनवटे यांची आत्महत्या…
बेलापूर- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील प्रसिद्ध संदिप ढोल पार्टीचे मालक श्री.नवनाथ धनवटे यांचे ज्येष्ठ चिरंजीव संदिप नवनाथ धनवटे यांनी काल रात्री १२ वा.च्या सुमारास आत्महत्या केल्याने त्यात त्यांचे निधन झाले.
त्यांनी अशाप्रकारे जीवनयात्रा का संपवली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी १२.३० वाजता राहत्या घरून बेलापूर पोलिस दूरक्षेत्र शेजारून निघेल.
त्याच्यामागे पत्नी,तीन मुले, आई,वडील,एक बहीण असा मोठा परिवार आहे.