शिवप्रहार न्यूज- धक्कादायकः शिर्डीत पाच जणांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार!

धक्कादायकः शिर्डीत पाच जणांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार!
शिर्डी (शिवप्रहार न्यूज)-साईबाबांच्या पावन भूमीत शिर्डीत पाच नरधम आरोपींनी एका गरीब गरीब २१ वर्षे वयाच्या तरुणीवर सामुहिक आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. शिर्डीत येणारे भवीक हादरले आहेत. शिर्डीत गुन्हेगारांचे किती राक्षसी रूप वाढले आहे. हे या घटनेवरून समोर आले आहे. तरुणीवर जिल्ह्यातील एका रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे. या अमानवी भयंकर घटनेची अधिक माहिती अशी की, नगर परिसरातील परिसरातील एक 21 वर्षाची तरुणी शिर्डीत आली असता ती मंदिर परिसरात थांबली होती, त्यावेळी अनोळखी पाच नराधम तरुणांनी रात्रीच्या वेळी या गरीब तरुण मुलीला आम्ही तुला जेवण देतो असे सांगून एका शिर्डीतील खोलीत नेले व तेथे तिचे हातपाय बांधून, तोंडात बोळा कोंबून, तिच्या अंगावरील कपडे कात्रीने कापून एका-एकाने जबरदस्तीने आळीपाळीने पीडित तरुणीवर शारीरिक संबंध करून सामुहिक बलात्कार केला. या भयंकर संकटांनी हादरून गेलेली तरुणी कशीबशी सावरली तिला सध्या जिल्ह्यातल्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असून रुग्णालयात तिने वरील प्रमाणे जबाब दिल्यावरून अज्ञात पाच नराधम आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिसात भादवि कलम 376-ड, 34 प्रमाणे जबरी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी डीवायएसपी अजित पाटील यांनी भेट दिली पुढील तपास पोसई पाठक हे करीत आहे. बाबांच्या शिर्डीत गुन्हेगारांचे वास्तव्य प्रचंड वाढले असून आजूबाजूच्या परिसरातील गुन्हेगारांबरोबरच बाहेरचे गुन्हेगारही शिर्डीत राहतात व त्यांचा वावर असतो. पोलिसांपुढे पाच लिंग पिसाट आरोपी पकडणे हे मोठे आव्हान आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर दुसऱ्या घटनेत शिर्डीतच पुन्हा एका तीस वर्षे वयाच्या तरुणीला शिर्डीतीलच आरोपी अर्जुन सिताराम पवार राहणार वीरभद्र पार्किंग साई कॉम्प्लेक्स समोर शिर्डी या आरोपीने मी तुझ्याशी लग्न करीन असे लग्नाचे आमीष दाखवून वेळोवेळी शिर्डी येथील एसटी स्टँड जवळील मुरली हॉटेल व लॉजवर नेऊन पीडित तरुणीवर शारीरिक संबंध करून बलात्कार केला. हा प्रकार काल पीडित तरुणीने शिर्डी पोलिसांत फिर्याद दिल्यावर आरोपी अर्जुन सिताराम पवार विरुद्ध भादवि कलम 376, 504 प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून डीवायएसपी सातव, पोनि पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सपोनी पाटील हे पुढील तपास करीत आहे. पीडीत तरुणी पुणे जिल्ह्यातील असल्याचे समजते. शिर्डीत अवैध अनैतिक कामासाठी लॉज, हॉटेलचा वापर होतो हे या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाले आहे. अनेक भक्तांना चोरीचा अथवा अन्य त्रास झाला तरी बाहेरून आल्याने फिर्याद देणे टाळतात त्यामुळे अनेक गुन्ह्याचे प्रकार समोर येत नाही.