शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक पदावर साळवे यांच्या जागी खाडे यांची नियुक्ती…

श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक पदावर साळवे यांच्या जागी खाडे यांची नियुक्ती…
श्रीरामपूर - चार दिवसांपूर्वी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व दोन कर्मचाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांनी मधुकर साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली केली.
रिक्त जागेवर पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांची श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे प्रभारीपदी नियुक्ती पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांनी केली आहे.