शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील व्यापारी चे गोडाऊन फोडून पन्नास हजाराचा माल चोरला…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील व्यापारी चे गोडाऊन फोडून पन्नास हजाराचा माल चोरला…

श्रीरामपुरातील व्यापारी चे गोडाऊन फोडून पन्नास हजाराचा माल चोरला…

श्रीरामपूर - येथील भुसार मालाचे व्यापारी मोहित संजय कोठारे यांचे गोडाऊन फोडून 50 हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला आहे. वडाळा महादेव बस स्टँड शेजारी असलेल्या कोठारे यांच्या गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्यांनी गोडाऊन ची मागची भिंत फोडून गोडाऊन मधील 50 हजार रुपये किमतीच्या सोयाबीनच्या २१ गोण्या चोरून नेल्या आहे. 

      याप्रकरणी कोठारे यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुरंनं 251/2022 भादवि कलम 380, 457, 454 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल परदेशी हे करीत आहेत.