शिवप्रहार न्युज - बायकोचे काढलेले उघडे फोटो मोबाईल विकल्याने झाले व्हायरल...

शिवप्रहार न्युज -  बायकोचे काढलेले उघडे फोटो मोबाईल विकल्याने झाले व्हायरल...

बायकोचे काढलेले उघडे फोटो मोबाईल विकल्याने झाले व्हायरल...

   संगमनेर (शिवप्रहार न्युज)- एका तरुणाने स्वतःचे व त्याच्या बायकोचे उघडे- नागडे फोटो काढले, मोबाईल बदलला आणि ते नागडे, अश्लील फोटो व्हायरल झाल्याने त्याला आता उघडे फोटो काढणे चांगलेच त्रासदायक ठरले आहे.

         याबाबत अधिक माहीती अशी की, संगमनेर शहरातील एका तरुण दुकानदाराने ५ जी मोबाईल घेतला होता. त्यात त्याने त्याच्या बायकोचे व त्याचे उघडे अश्लील फोटो काढले होते. ते फोटो ते दोघे नवरा-बायको पहायचे. नंतर मोबाईलची एक्सचेंज ऑफर आली आणि मोबाईल मधील डाटा क्लिअर न करताच पतीने मोबाईल दिला व नवा खरेदी केला. मात्र अज्ञात व्यक्तीने जुन्या मोबाईल मधील नवरा-बायकोचे अश्लील फोटो वेगवेगळ्या पोर्न वेबसाईटवर अपलोड करून तरुणाचे व त्याच्या बायकोचे खाजगी आयुष्य नितीभ्रष्ट करून,बिघडविण्याचा प्रयत्न करून बदनामी केली.

       हा प्रकार दिनांक १२ जुन २०२४ ते ६ जुन २०२५ दरम्यान घडला. काल याप्रकरणी ४० वर्षाच्या तरुण दुकानदाराने संगमनेर शहर पोलीसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 356 (2),294 आयटी ॲक्ट 76 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि.देशमुख हे पुढील तपास करीत आहे.