शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यात हातभट्टीवर छापा…

श्रीरामपूर तालुक्यात हातभट्टीवर छापा…
श्रीरामपूर - तालुक्यातील मातापूर येथे गोपाळवस्ती येथे राहत्या घराच्या भिंतीआड अडोशाला सुरू असणाऱ्या हातभट्टी दारू अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि.१४ ऑक्टोबर रोजी १.१५ च्या सुमारास आरोपी नितीन पवार, गोपाळवस्ती, मातापूर याच्या राहत्या घराच्या भिंतीआड गावठी हातभट्टीची तयार दारू व कच्चे रसायन विक्री करताना मिळून आले.
याप्रकरणी पोलिसात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) (इ) प्रमाणे गुरनं. ९३९/२०२२ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. परदेशी हे करीत आहेत.