शिवप्रहार न्यूज -गोल टोप्या घातलेल्यांनी “हमारे मोहल्ले मे आने का नही, आये तो हालत खराब कर देंगे” असे म्हणत पोलिसांना धमकावले

गोल टोप्या घातलेल्यांनी “हमारे मोहल्ले मे आने का नही, आये तो हालत खराब कर देंगे” असे म्हणत पोलिसांना धमकावले...
संगमनेर - याबाबतची हकीकत अशी की,संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई श्री.रामेश्वर पंडित, पोलीस शिपाई श्री.भोजे,पोलीस शिपाई श्री.भालेराव हे सायंकाळी सहा वाजता तीन बत्ती चौकात पेट्रोलिंग कर्तव्य करत होते. त्यावेळी अचानक तेथे तिघेजण त्यांच्यासमोर आले. त्यांनी आपल्या डोक्यामध्ये गोल टोप्या घातलेल्या होत्या. त्या वेळी या तिघांनी पोलीसांना “ तुम्हे समजता नही क्या,पिछले टाईम तुम्हारे लोगोको कैसे दौडा दौडा के मारा था,हमारे मोहल्ले मे वापीस आने का नही. नही तो तुम्हारी हालत खराब कर देंगे “ अशा भाषेत या समाज विघातक व्यक्तींनी पोलिसांना धमकी दिली.
या घटनेवरून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद क्रमांक 777/ 2021 भादवि कलम 186 प्रमाणे सरकारी कामात अटकाव करण्याचा एन.सी. गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उप निरीक्षक श्रीमती महाले या करीत आहेत.या समाजविघातक प्रवृत्तींवर एन.सी. सारखा किरकोळ गुन्हा नोंदविण्यात आल्याने संगमनेरकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ज्या ठिकाणी पोलीसांना ही धमकी देण्याची घटना घडली त्याच तीन बत्ती चौकामध्ये गेल्या महिन्यात पोलिसांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. यामधील काही आरोपींना अद्याप पर्यंत अटक झालेली नसल्याचे समजते.अशा परिस्थितीत या समाजघातक प्रवृत्तीच्या लोकांनी पुन्हा एकदा पोलिसांना धमकावले आहे.
आज ही समाज घातक प्रवृत्ती वर्दी घातलेल्या पोलिसांवर उगरत आहे. आज या समाजघातक प्रवृत्तीमुळे पोलिसांवर ही वेळ येत असेल तर उद्या सर्वसामान्यांवर कोणती वेळ येऊ शकते याची कल्पना न केलेली बरी! तरी या समाजघातक प्रवृत्तींना तात्काळ वेसन घालावे असे मत
“शिवप्रहार प्रतिष्ठान” संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.