शिवप्रहार न्यूज- बेलापूरचे भूमिपूत्र स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज मथुरा श्रीकृष्ण मंदिर समितीच्या विश्वस्तपदी…

शिवप्रहार न्यूज- बेलापूरचे भूमिपूत्र स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज मथुरा श्रीकृष्ण मंदिर समितीच्या विश्वस्तपदी…

बेलापूरचे भूमिपूत्र स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज मथुरा श्रीकृष्ण मंदिर समितीच्या विश्वस्तपदी…

श्रीरामपूर- बेलापूरचे भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज तथा पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास यांची मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर समितीचे विश्वस्त म्हणून दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने नियुक्ती करण्यात आली. या निवडीची बातमी कळताच बेलापूर ग्रामस्थांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. 

        अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्यदिव्य श्रीराम मंदिर निर्माण समितीचे खजिनदार म्हणून केंद्र सरकारने सोपवलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळीत असताना आता मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर समितीचे विश्वस्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पं.मदनमोहन मालवीय महाराज यांच्या प्रेरणेतून तसेच संस्थापक संत श्री. हनुमानप्रसाद पोद्दार (कल्याण) यांच्या विशेष सहकार्याने सन १९५१ मध्ये मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.     

        स्वामीं गोविंददेव गिरिजी महाराज यांच्या निवडीची बातमी समजताच पं.महेश व्यास यांच्या अधिपत्याखालील पेठेतील जुन्या बालाजी मंदिरापुढे फटाके फोडून, आरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.