शिवप्रहार न्यूज-नगर-पुणे रस्त्यावर ट्रक-टँकरमधून ग्रॅस, डिझेल, आॕईल चोरणारे रॕकेट उघड…

नगर-पुणे रस्त्यावर ट्रक-टँकरमधून ग्रॅस, डिझेल, आॕईल चोरणारे रॕकेट उघड…
नगर- पुणे रस्त्यावर हॉटेलच्यामागे गॅस टँकर, डिझेल टँकर, ऑईल टँकर या टँकरमधून डिझेल, ऑईल, गॅस चोरणारे रॅकेट काल पोलिसांनी पकडले. विशेष बाब म्हणजे नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. टँकर चालकाशी संगनमत करून हॉटेलच्या मागे हा डिझेल, ऑईल, गॅस चोरीचा खळबळजनक प्रकार सुरू होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील हे दोन दिवसांपासून नगर जिल्हयात आलेले असून काल त्यांना गुप्त खबर मिळाली. त्यावरून त्यांच्या विशेष पथकाने नगर पुणे महामार्गालगत असलेल्या वाघुंडे बुद्रुक शिवारातील हॉटेल सौरभच्या पाठीमागे छापा टाकला. या ठिकाणाहून धक्कादायक असे ज्वलनशिल पदार्थ साठा केल्याचे व बेकायदेशिर दारू साठा मिळून आला. त्यात ऑक्सिजन सिलेंडर, बोलेर मॅक्सी ट्रक प्लस पिकअप क्र. एमएच १४, एचजी ३८५५, देशी व विदेशी दारूच्या बाटल्या, लोखंडी रॉड, गॅस सिलेंडर, ट्रक प्लस पिकअप क्र. एमएच १४ डीएम ७७०४ आदी आढळून आले. आरोपींनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नगर-पुणे राज्य महामार्गावर या रस्त्याने जाणाऱ्या गॅस टँकर, डिझेल टँकर, ऑईल टँकर, होर्जिंग माती, अॅल्युमिनीयम तसेच स्टील वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकांशी संगनमत करून सदर वाहने हायवे रस्त्याच्या बाजूला असलेल्या सौरभ हॉटेलच्या पाठीमागे नेवून सदर ठिकाणी टँकर (कॅप्सूल) मधून गैरकायदेशिर गॅस सिलेंडर भरण्याचे साहित्य व साधने वापरून सदर टँकर (कॅप्सूल) मधून सिलेंडरमध्ये ज्वलनशिल एलपीजी गॅस भरून अवैधरित्या गॅसची तसेच र ज्वलनशिल डिझेल, ऑईल, त होर्जिंग माती, अॅल्युमिनियम व स्टीलची चोरी करून काळ्याबाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांचे कामगारांच्या मदतीने साठवणूक करून ठेवलेली आहे.
तसेच हॉटेल सौभरवर विनापरवाना, बेकायदा देशी व विदेशी दारूच्या बाटल्या प्रोव्हीजन गुन्हयाचा माल बेकायदेशिर रित्या स्वतःच्या कब्जात आढळून आले. याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या पथकातील पोलीस हवालदार शेख शकील अहमद यांच्या फिर्यादीवरून आरोपी नंदकिशोर पांडुरंग गाडीलकर, वय ५०, रा. वाघुंडे बुद्रुक, ता. पारनेर, पांडुरंग रभाजी गाडीलकर, वय ६५, रा. वाघुंडे बुद्रुक, ता. पारनेर, समसुल्ला सराफतउल्ला खान, रा. रो-हाऊस, आदर्शनगर, सुपा, ता. पारनेर, मूळ रा. उत्तरप्रदेश (मॅनेजर), कमीतलाल मुन्नीलाल गुप्ता, वय ४२, - रा. सद्या हॉटेल सौरभ, वाघुंडे बुद्रुक, ता. पारनेर, मूळ रा. उत्तरप्रदेश, शिवम अर्मीतलाल गुप्ता, वय २०, रा. उत्तरप्रदेश, इस्तीखारखान शरीफखान, वय २१, सद्या रा. हॉटेल सौरभ, वागुंडे बुद्रुक, ता. पारनेर, निखिल अनिल गाडीलकर, रा. वाघुंडे बुद्रुक, ता. पारनेर, संजय सुभाष पवार, रा. सोनवडी, ता. दौंड (ट्रक चालक) तसेच घटनास्थळावरून पळाले ले अन्य आरोपी अशांविरूद्ध सुपा पोलिसात भादंवि कलम ३७९, ४०७, २८५, २८६, ३४ व LIQUE EFIED PETROLIUMGAS (REGULATION OF SUPPLY ANMDDISTRIBUTION २००० चे दिनांक २६.४.२००४ चे उल्लंघन के ल्याने जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ सह मुप्रोकाक ६५ इ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच पोनि. बापू रोहन, सपोनि सचिन जाधव, पोनि गोकावे यांनीही घटनास्थळी भेट देवून कामगिरी बजावली. सफौ. कापनगुडे हे पुढील तपास करीत आहेत. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. हॉटेलमध्ये परप्रांतीय कामगार कामासाठी ठेवल्याचे आढळून आले त्यामुळे या प्रकारातील गांभीर्य आणखीन वाढले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील यांच्या ठोस आदेशाने धडक कामगिरी काल पोलिसांनी बजावली व डिझेल, ऑईल, गॅस, स्टील चोरणारे रॅकेट उघड केले.