शिवप्रहार न्यूज- निलंबित PI सानपला मुल्ला कटर भोवणार;दोषी आढळल्यास डायरेक्ट घरी पाठवणार…

निलंबित PI सानपला मुल्ला कटर भोवणार;दोषी आढळल्यास डायरेक्ट घरी पाठवणार…
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन भागातील सराईत गुन्हेगार मुल्ला कटर/इमरान कुरेशी याला हिंदू मुलीचे धर्मांतर- निकाह प्रकरणात मदत करणारा तत्कालीन पीआय सानप याचा विषय काल विधानसभेत व राज्यातील मीडियामध्ये प्रचंड गाजला.यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणात चौकशी करून पोलीस निरीक्षक सानप हा दोषी आढळल्यास त्याला कलम 311 च्या विशेष अधिकाराचा वापर करून थेट पोलीस सेवेतून हाकलून लावून,बडतर्फ करुन(DISMISS)घरी पाठवणार असल्याचे सांगितले.
तसेच पोलीस खात्यातील सूत्रांनी देखील सांगितले की,पोलीस निरीक्षक सानप याचे मुल्ला कटर याच्यासोबत संबंध होते.कारण सहा महिन्यापूर्वी मुल्ला कटर याने वार्ड नंबर दोन भागांमध्ये एका पोलीस शिपायाला सार्वजनिक ठिकाणी जनतेसमोर शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील हिंदुत्ववादी तरुणांनी सानप याला दाखवला होता.परंतु त्यावेळी सानप याने मुल्ला कटर याच्यावर गुन्हा दाखल केला नाही उलट दुसरीकडे बिगरराजकीय हिंदुत्ववादी तरुणांना त्रास देवुन फक्त आणि फक्त सेक्युलरवादी राजकारणी लोकांचे ऐकणारा PI सानप याने त्या प्रकरणात देखील मुल्लाला पाठीशी घातले होते. हा व्हिडिओ देखील सरकारी यंत्रणांकडे पाठवण्यात आलेला आहे.
त्यामुळे या मुल्ला कटर प्रकरणात PI सानप याला पोलीस सेवेतून बडतर्फ(DISMISS)करून थेट घरी पाठवण्याची शक्यता असुन तसे काम सरकारकडून चालू असल्याचे समजते.