शिवप्रहार न्यूज- मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंची धडपकड शहर पोलिसांकडून सुरूच;०९ रोडरोमिओ धरले…

मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंची धडपकड शहर पोलिसांकडून सुरूच;०९ रोडरोमिओ धरले…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यतत्पर पोलीस निरीक्षक श्री.हर्षवर्धन गवळी यांच्या आदेशानुसार एपीआय श्री.पाटील व डीबी पथकातील राहुल नरवडे,गौतम लगड,गौरव दुर्गुडे यांच्या पथकाने श्रीरामपूर शहरातील विविध महाविद्यालय व शाळांसमोर फिरणाऱ्या रोड रोमओंना पकडून त्यांच्यावर कारवाई चालूच ठेवली आहे.
आज बुधवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी शहरामध्ये एकूण आठ ते नऊ रोड रोमिओंला धरून पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईमुळे विद्यार्थीनी,मुली व पालक वर्गाकडून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.तसेच मध्ये रोड रोमिओंना धडकी भरली आहे.