शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर परिसरात एकाचा गळफास तर दोघांचे अकस्मात मृत्यू…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर परिसरात एकाचा गळफास तर दोघांचे अकस्मात मृत्यू…

श्रीरामपूर परिसरात एकाचा गळफास तर दोघांचे अकस्मात मृत्यू…

श्रीरामपूर- श्रीरामपूर परिसरात दोन जणांचे अकस्मात मृत्यू झाले तर उक्कलगावात तरुणाने गळफास घेवून आपले जीवन संपविले.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव परिसरात राहणारा तरूण संदीप बाळासाहेब तांबे, वय - ३० वर्षे याने गळफास घेतल्याने त्याला उपचारासाठी नातेवाईकांनी श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता संदीप बाळासाहेब तांबे या तरूणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला होता. तशी खबर साखर कामगार रूग्णालयाच्या डॉक्टरांनी श्रीरामपूर शहर पोलिसात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून संदीप तांबे या तरूणाने नेमका कोठे ? कसा ? का ? गळफास घेतला याचा पुढील तपास पोनि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोना पंडीत हे करीत आहेत.

         दुसऱ्या घटनेत श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर परिसरात राहणारा तरूण सतीश बबन गायकवाड, वय २७ वर्षे हा मृतावस्थेत मिळून आला. तशी खबर मारूती गंगाधर गिरासे, रा. मातापूर यांनी श्रीरामपूर शहर पोलीसात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सतीश बबन गायकवाड हा तरूण नेमका कोठे? कसा ? कधी मृत आढळून आला ? त्याचा मृत्यू कशाने झाला ? याचा पुढील तपास पोनि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विठ्ठल पाटील हे करीत आहेत.

       तिसऱ्या घटनेत श्रीरामपूर शहरातील नॉदर्न बँच परिसरात राहणारे मधुकर विश्वनाथ डहाळे, वय ५४ यांना उपचारासाठी संजीवन हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता मधुकर विश्वनाथ डहाळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला होता. संजीवन रूग्णालयाच्या डॉक्टरांनी तशी खबर श्रीरामपूर शहर पोलीसात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मधुकर विश्वनाथ डहाळे यांचा नेमका कशाने मृत्यू झाला? याचा पुढील तपास पोनि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोना पंडीत हे करीत आहेत.