शिवप्रहार न्युज - ऋषिकेश छल्लारे यांचे अपघाती निधन...

ऋषिकेश छल्लारे यांचे अपघाती निधन...
श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील भोकर गावातील नेते तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे समर्थक श्री.गणेश भारत छल्लारे यांचे चिरंजीव ऋषिकेश गणेश छल्लारे याचा काल भोकर-खोकर शिवारामध्ये वाहन मागे घेत असतांना अपघात झाला.त्यामध्ये ऋषिकेशचा मृत्यू झाला आहे.
तरी होतकरू युवा ऋषिकेश याच्या जाण्यामुळे छल्लारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.भोकर गावामध्ये देखील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.