शिवप्रहार न्युज - महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; सामाजिक संघटनेच्या महिलेने दिला त्रास ? 

शिवप्रहार न्युज -  महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; सामाजिक संघटनेच्या महिलेने दिला त्रास ? 

महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; सामाजिक संघटनेच्या महिलेने दिला त्रास ? 

   अहिल्यानगर (शिवप्रहार न्युज)- अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस अंमलदाराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज रविवार दि. 8 जून रोजी सकाळी सुमारे 11:30 च्या दरम्यान घडली. जयश्री हरिश्चंद्र सुद्रिक रा.कोपर्डी, ता. कर्जत असे या महिला पोलीस अंमलदाराचे नाव आहे.

       सुद्रिक यांनी वाहतूक शाखेत येण्यापूर्वीच विषारी औषध घेतल्याचे समजते. शहर वाहतूक शाखेत आल्यावर त्यांना त्रास जाणवू लागल्याने सहकाऱ्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती पाहता त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

        सुद्रिक यांच्या जवळून एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यात एका सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्याने मानसिक त्रास दिल्याचे नमूद करण्यात आले असल्याचे समजते.