शिवप्रहार न्यूज-भोकरमध्ये मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमुळे गरीब कुटुंबाचे घर जळून खाक…

शिवप्रहार न्यूज-भोकरमध्ये मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमुळे गरीब कुटुंबाचे घर जळून खाक…

भोकरमध्ये मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमुळे गरीब कुटुंबाचे घर जळून खाक…

 श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील बारा खोंगळ्या तलावाजवळ राहत असलेले आबासाहेब दत्तू बर्डे यांच्या घराच्या छपराला मध्यरात्री अचानक आग लागल्यामुळे या आगीत त्यांच्या घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने बर्डे कुटुंबाने प्रसंगावधान राखल्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही.परंतु घरातील धान्याच्या गोण्या,टीव्ही,कपाट लाकडी वस्तू, बांबू व पाचरट याच्यासह सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

         या घटनेत बर्डे कुटुंबाचे जवळपास लाखभर रुपयांचे नुकसान झाले आहे.प्रशासनाने पंचनामा केला असून त्यांना प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी आदिवासी समाज बांधव व स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.