शिवप्रहार न्युज - समाजकंटकांनी श्रीराम मंदिर चौकातला बॅनर फाडला...

समाजकंटकांनी श्रीराम मंदिर चौकातला बॅनर फाडला...
श्रीरामपूर - शहरातील श्रीराम मंदिर चौक या ठिकाणी हिंदुत्ववादी नेतृत्व,गोरक्षक श्री.निलेशजी परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी लावलेला बॅनर हा काल शुक्रवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी फाडल्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,श्री.निलेश परदेशी हे हिंदुत्ववादी नेतृत्व असून तालुक्यातील राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष आहेत.त्यांनी बऱ्याच गोरक्षणाच्या कार्यवाहीमध्ये सहभागी होत गोरक्षणाचे कार्य देखील चोखपणे केले आहे.त्यांच्या या हिंदुत्ववादी कार्याचे विरोधक असलेल्या किंवा विरोधी विचाराच्या लोकांनी हे कृत्य केले असल्याची शंका त्यांच्याकडून व्यक्ती केली जात आहे.तरी सदर घटनेमुळे श्रीरामपूरचे वातावरण गढूळ होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने याची दखल घेत सदर समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी असे आवाहन राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष श्री.निलेश परदेशी यांच्याकडून करण्यात आले आहे.
दरम्यान पोलीसांच्या हाती या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज मिळत असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.