शिवप्रहार न्यूज- बेलापूर लव्ह जिहाद प्रकरणी “शिवप्रहार प्रतिष्ठान”चा श्रीरामपूर पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा...

बेलापूर लव्ह जिहाद प्रकरणी “शिवप्रहार प्रतिष्ठान”चा श्रीरामपूर पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा...
श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या गावामधील एका 14 वर्षीय हिंदू मुलीला त्याच गावातील आयुब शेख नावाच्या 22 वर्ष तरुणाने लव्ह जिहाद करून तिला दिनांक 23 जुलै रोजी पळवून नेले आहे. या चौदा वर्षीय हिंदू मुलीला पळवून नेल्याचा घटनेला 18 दिवस झाले असून आरोपी म्हणून आयुब शेख याचे नाव अजून देखील गुन्ह्यामध्ये घेण्यात आलेले नाही.
तसेच 18 दिवसापासून ही हिंदू मुलगी पोलिसांना मिळून येत नाहीये.म्हणून “शिवप्रहार प्रतिष्ठान,श्रीरामपूर” च्या वतीने त्या हिंदू मुलीच्या कुटुंबीयांसह शेकडो हिंदू मावळ्यांचा मोर्चा श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन वर काढण्यात आला.
या मोर्चाची सुरुवात आज सोमवार ०९ ॲागस्ट रोजी सकाळी ११ वाजता “शिवप्रहार प्रतिष्ठान” च्या बजरंगनगर,बेलापूररोड,श्रीरामपूर येथील कार्यालयापासून झाली. बेलापुर रोड, मेनरोड मार्गे हा शिवरायांच्या शेकडो मावळ्यांचा मोर्चा पोलीस स्टेशनवर धडकला. यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनकडून लवकरात लवकर या हिंदू मुलीचा शोध घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
तसेच जर लवकरात लवकर या 14 वर्षीय हिंदू मुलीचा शोध लागला नाही तर आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येईल असा इशारा यावेळी शिवप्रहारच्या वतीने देण्यात आला आहे.
श्रीरामपूर शहरामध्ये कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश नसलेला फक्त हिंदू समाजाचा हा मोर्चा होता.शिवप्रहार प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली हिंदू समाजाने आपल्या एका हिंदू भगिनीसाठी काढलेला हा भव्य मोर्चा होता.