शिवप्रहार न्युज - संभाजीनगरात रिक्षावाल्याकडून श्रीरामपूरच्या विद्यार्थ्याचा खून…

शिवप्रहार न्युज -  संभाजीनगरात रिक्षावाल्याकडून श्रीरामपूरच्या विद्यार्थ्याचा खून…

संभाजीनगरात रिक्षावाल्याकडून श्रीरामपूरच्या विद्यार्थ्याचा खून…

छत्रपती संभाजीनगर- डीएडची परीक्षा देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थी व रिक्षा चालक यांच्यात भाडे देण्यावरुन वाद झाला.वादाचं परिवर्तन हाणामारीत झाले. मारहाणीत चालकाने श्रीरामपूर येथील पॅसेंजरच्या पोटात चाकू भोसकून खून केला.ही घटना शहरातील नगर नाका येथील इन्कम टॅक्स कार्यालयाजवळ घडली.मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. जयराम बबन पिंपळे,वय २८ रा.श्रीरामपूर,जिल्हा अहिल्यानगर असे मयत परीक्षार्थीचे नाव आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेचा तपास करून एका संशियत आरोपीला अटक केली आहे.

          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक डी.एडचा विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी वाळुज येथे जात असताना बाबा पेट्रोलपंप येथे रिक्षात बसला. त्यानंतर दोघांमध्ये भाड्यासंबंधी वाद निर्माण झाला. त्यानंतर त्या दोघांमध्ये मारहाण झाली. त्या दरम्यान रिक्षाचालकाने पॅसेंजरवर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला. त्या अवस्थेतच त्याने रिक्षाची चावी काढली आणि बाबा पेट्रोलपंपापर्यंत पळत गेला. तेथून त्याने रिक्षा पकडली आणि स्वत:हून रुग्णालयात दाखल झाला. सदर विद्यार्थी हा डीएड परीक्षेसाठी श्रीरामपूर येथून छत्रपती संभाजीनगर येथे आला होता. त्याचे परीक्षा केंद्र वाळूज येथे असल्याने तो तेथे जात होता.

या प्रकरणात जखमी झालेल्या मयत विद्यार्थ्याचे नाव हे जयराम पिंगळे आहे.   

           पोलिसांनी संशियत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीच्या अटकेसंबंधी माहिती देताना सांगितले की, आयकर कार्यालयाच्या येथील कॅमेऱ्यात अतिशय धुरकट 4 क्रमांक पाहता येतो. आरटीओ विभागाकडून आम्ही सिरीज प्राप्त करुन घेतली. रिक्षाचा मेक बघितला, त्यासोबतच वाहतूक शाखेची मदत घेतली. तसेच सदर रिक्षावर यापूर्वी चलन आहे का? त्यात फोटो पाहिले. क्रमांकांची पडताळणी केली आणि सदर संशयित आरोपी सापडला असून त्याच्यासंबंधी पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.त्याचे नाव पोलीसांनी अद्याप स्पष्ट केले नाही.आज उपचाराधीन असणाऱ्या जखमी परीक्षार्थीचा दुर्दैवाने मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.