शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ;दोन कालवडी,दोन कुत्रे,चार शेळ्यांवर हल्ला...

श्रीरामपूर तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ;दोन कालवडी,दोन कुत्रे,चार शेळ्यांवर हल्ला...
श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर,भोकर,एकलहरे या गावात बिबट्याने धुमाकूळ घातला असून काल बिबट्याने बेलापूर खुर्द गावातील सुदाम नारायण शिंदे या शेतकऱ्याच्या चार दुभत्या शेळ्या ठार केल्या.त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.वनविभागाने या घटनेचा पंचनामा केला असून नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
तसेच भोकर येथे एका शेतकर्याच्या दोन कालवडी व एका कुत्र्याचा जीव बिबट्याने घेतल्याची देखील घटना घडली असून तेथे देखील पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.
एकलहरे गावात तीन-चार दिवसांपूर्वी बिबट्याने एका पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला होता.त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे.
या सर्व घटनांवरून असे दिसते की, ३-४ बिबटे हे श्रीरामपूर तालुक्यात धुमाकूळ घालीत आहेत.