शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरातील हिंदुत्ववादी नेत्या पूनम गांधी यांचे निधन...

श्रीरामपुरातील हिंदुत्ववादी नेत्या पूनम गांधी यांचे निधन...
श्रीरामपूर (प्रतिनिधी) -श्रीरामपूर शहरातील रहिवासी विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा बाल संस्कार प्रमुख तथा समाजप्रबोधन कार्यकर्त्या सौ. पूनम सुहास गांधी (वय ४२) यांचे काल ओव्हरब्रिजजवळ झालेल्या अपघातामुळे निधन झाले. अपघातानंतर त्यांना नगर येथील साईदिप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते परंतु संध्याकाळी ६ वाजता त्यांचा उपचार चालू असताना मृत्यू झाला. आज सकाळी ११ वाजता त्यांचा श्रीरामपूर येथे अंत्यसंस्कार झाला.
सौ.पूनम गांधी या वडाळा महादेव येथील अजितदादा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये योग शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. विहिंप मधील संघटनात्मक कामांसाठी त्यांनी श्रीरामपूर व बेलापूर येथे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकवाचे मोठे कार्यक्रम आयोजित केले होते ज्यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.त्यांनी नुकताच श्रीरामपूरमध्ये बाल संस्कार वर्ग सुरू केला होता.
त्यांच्या पश्चात पती सुहास गांधी, मुलगी कु. सिया, मुलगा चि. नक्ष, सासू, दिर, पुतणे असा परिवार आहे.