शिवप्रहार न्युज - वार्ड ०३ मधील घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी साथीदारासह ताब्यात... 

शिवप्रहार न्युज -  वार्ड ०३ मधील घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी साथीदारासह ताब्यात... 

वार्ड ०३ मधील घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी साथीदारासह ताब्यात... 

श्रीरामपूर- नमूद बातमीची हकिगत अशी की, दि.08/05/2025 रोजी फिर्यादी आदित्य शंकर जावळकर, रा.वॉर्ड नं.3, श्रीरामपूर हे त्यांचे कुटुंबियासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात आरोपीतांनी घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागीने, मुर्ती असा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला.याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.502/2025 बीएनएस कलम 331 (1) (4), 305 (अ) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.

 मा.पोलीस अधिक्षक,अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्हयातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार फुरकान शेख, संदीप दरंदले, रणजीत जाधव, विशाल तनपुरे, बाळासाहेब गुंजाळ, जालींदर माने, प्रशांत राठोड व मेघराज कोल्हे अशांचे पथक नेमुण घरफोडी गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

    हे पथक वर नमूद घरफोडीच्या गुन्हयाचा गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणावरून तपास करत असताना हा गुन्हा सनी सोमनाथ राक्षे व त्याचे साथीदारांनी केला असून ते नॉर्दन ब्रांच कॅनॉल जवळ असल्याची माहिती प्राप्त झाली.मिळालेल्या माहितीवरून पथकाने नमूद ठिकाणी जाऊन पंचासमक्ष 1) एक विधी संघर्षित बालक, वय 17, रा.कुंभार गल्ली, वॉर्ड नं.3, दत्त मंदिराचे पाठीमागे, श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर 2) विकी अरूण डंबाळे, वय 19, रा.कुंभार गल्ली, वॉर्ड नं.3, श्रीरामपूर अशांना ताब्यात घेतले.पथकाने पंचासमक्ष आरोपीचे ताब्यातुन 38,000/- रू किं.त्यात मुर्ती, मोबाईल, नथ असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी 3) सनी सोमनाथ राक्षे, रा.श्रीरामपूर (फरार) याचेसह सदरचा गुन्हा केला असून चोरी केलेला काही मुद्देमाल सनी सोमनाथ राक्षे याचेकडे आहे.तसेच उर्वरीत मुद्देमाल हा 4) रोहित उर्फ बाबा शिंदे, रा.वॉर्ड नं.3, श्रीरामपूर (फरार) याच्याकडे विक्रीसाठी दिलेला असल्याची माहिती दिली.   

        पथकाने आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत. 

        सदर कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर, व मा.श्री.बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.