शिवप्रहार न्युज - मुख्यमंत्र्यांचे पत्र देवून डॉक्टरला ६० लाखाला फसवले...

शिवप्रहार न्युज -  मुख्यमंत्र्यांचे पत्र देवून डॉक्टरला ६० लाखाला फसवले...

मुख्यमंत्र्यांचे पत्र देवून डॉक्टरला ६० लाखाला फसवले...

अहिल्यानगर/जामखेड ( शिवप्रहार न्युज) राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या सहीचे बनावट पत्र देवून डॉक्टरला ६० लाखाला फसविल्याचा प्रकार घडल्याने हे बनावट पत्र देणारा आरोपी सुमित सुहास गंडी,रा.वडगांव बु॥ पुणे याच्याविरुद्ध जामखेड पोलिसांत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४),३३६( ४ ),३३७,३४०(२) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

         या प्रकरणी जामखेड येथील डॉक्टर भास्कर रामभाऊ मोरे (वय ५१ ) रत्नदीप हॉस्पीटल,जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आरोपी सुमित गंडी याने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या सहीचे बनावट पत्र देवून माझी व नातेवाईक यांची ६० लाख रुपये घेवून फसवणूक केली.पुणे येथील कोथरूड पोलीसात हा गुन्हा दाखल होवून तो जामखेड पोलीसांत पुढील तपासासाठी आला आहे.  

       दरम्यान "शिवप्रहार न्यूज" ने जामखेड पोलीस ठाण्याचे पोनि पाटील यांच्याशी संपर्क साधला असता नुकतेच गुन्ह्याचे कागदपत्रं प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोनवलकर हे पुढील तपास करीत आहे .डॉक्टर भास्कर मोरे,जामखेड यांच्या घरात हा प्रकार घडल्याचे समजते.तरी या पत्राचा मजकूर समजू शकला नाही.