शिवप्रहार न्युज - ७५ वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार करणाऱ्या विकृत तरुणास अटक! 

शिवप्रहार न्युज -  ७५ वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार करणाऱ्या विकृत तरुणास अटक! 

७५ वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार करणाऱ्या विकृत तरुणास अटक! 

संगमनेर ( शिवप्रहारन्यूज) अकोले तालुक्यात एका भागात राहणारी एक ७५ वर्षाची वृद्ध महिला तिचे लेक व सुन बाहेर गेलेले असतांना ती सपरात कोपीत एकटीच होती.तेव्हा विकृत मानसिकतेचा आरोपी सोमनाथ ऊर्फ नाथा सोना बोर्डे,रा . खडकी खुर्द, ता. अकोले हा कोपीत घुसला व वृद्ध महिलेला धमकी देवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला व वृध्देस म्हणाला तु जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या मुलीबरोबरही असेच करील, मारुन टाकील अशी धमकी दिली.

        रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. वृद्ध महिलेने राजूर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी बोर्डे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला अटक केली आहे.पुढील तपास सपोनि सरोदे हे करीत आहे.एका वृद्ध महिलेवर तरुणाने बलात्कार करण्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .