शिवप्रहार न्युज - अशोकनगरचे आनंद भांड बेपत्ता...

शिवप्रहार न्युज -  अशोकनगरचे आनंद भांड बेपत्ता...

अशोकनगरचे आनंद भांड बेपत्ता...

श्रीरामपूर- या प्रकरणी बेपत्ता आनंद भांड यांची पत्नी शितल आनंद भांड,वय-२७, यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,मी माझे पती आनंद व सासु - सासरे व मुलगी आरुषी असे सर्वांनी एकञित जेवण करुन सर्व जण झोपी गेलो. त्यानंतर पहाटे 05/00 वा.मला झोपेतुन जाग आल्यावर मला पती आनंद हे दिसले नाही म्हणुन मी त्यांना घराबाहेर आजुबाजुला शेजारी - पाजारी माझ्या पतीचा शोध घेतला पण ते मिळुन आले नाही. त्यानंतरही ते मिळुन न आल्याने माझी खात्री झाली की माझे पती आनंद हे कोणास काही एक न सांगता घरातुन निघुन गेले आहे. 

         त्यांचे वर्णन खालील प्रमाणे :- 

नाव - आनंद विलास भांड,वय 33 वर्षे धंदा- नोकरी (अशोक सहकारी कारखाना अशोकनगर ) रा. अशोकनगर दुकान लाईन ता.श्रीरामपूर.

      वर्णन – रंग- सावळा, चेहरा-गोल, नाक-सरळ, बांधा-मध्यम, उंची 5 फुट 6 इंच, केस-मोठे, अंगात-काळे रंगाची पँन्ट गुलाबी रंगाचा शर्ट, पायात-काळ्या रंगाची चप्पल भाषात- मराठी, हिंदी बोलतो.

       तरी वरील वर्णनाचे इसम आनंद भांड कोणाला दिसून अथवा मिळून आल्यास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.