शिवप्रहार न्यूज- राहुरीत गोवंशीय जनावरांची 4 हजार किलो कातडी श्रीरामपूरच्या आरोपींकडुन जप्त…

राहुरीत गोवंशीय जनावरांची 4 हजार किलो कातडी श्रीरामपूरच्या आरोपींकडुन जप्त…
(श्रीरामपुर प्रतिनिधी):- दि. 22/02/2022 रोजी Dysp श्री.संदीप मिटके यांना राहुरी ते नगरकडे जाणारे रोडवर एक आयशर टेम्पोतुंन गो वंशीय जनावरांच्या कातडीची अवैध वाहतूक होत आहे. अशी खात्रीशीर गोपनीय बातमी मिळाल्याने राहुरी ते नगर जाणारे रोडवर राहुरी खुर्द येथे अधिकारी व अंमलदार यांचे पथक व दोन पंचासह छापा टाकून
1) 2,40,000/- रु. कि.चे 4 हजार
किलो गो वंशीय जनावरांची कातडी
2) 6,00,000/- रुपये किमतीचा एक आयशर टेम्पो
--------------------------
असा एकूण 8,40,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरचे छाप्याचा दोन पंचांसमक्ष पंचनामा करून आरोपी
1) बबलू रऊफ कुरेशी, रा.वार्ड नंबर
2,श्रीरामपूर
2) हारून गणी कुरेशी ,रा.वार्ड नंबर 2 श्रीरामपूर यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे पो. कॉ. नितीन शिरसाठ, नेमणूक -उपविभागीय कार्यालय श्रीरामपूर यांचे फिर्यादीवरून गुन्हा रजि.न - I l 156/2022 भा.द.वि. कलम 278 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. स्वाती भोर,Dysp संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली psi नार्हेडा, ASI राजेंद्र आरोळे, पो.कॉ. नितीन शिरसाठ, आदींनी केली.