शिवप्रहार न्युज - चोरट्याने गंठण ओढल्याने महिलेचा मृत्यु...

चोरट्याने गंठण ओढल्याने महिलेचा मृत्यु...
अहिल्यानगर( शिवप्रहार न्युज) अहिल्यानगर शहरातील भिंगार वारवाडी भागात राहणारे प्रदिप धोंडीराम तागडकर ( वय ४५ ) हे त्यांची पत्नी सौ. चैताली प्रदिप तागडकर ( वय ३५ ) यांच्यासह दुचाकी वरून जातेगांव शिवारात हॉटेल जयराज जवळून रस्त्याने जात असतांना दुचाकीवर आलेल्या दोन गुन्हेगार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओढल.यावेळी महीलेने गंठण हिसकवण्याच्या प्रयत्नातील आरोपीला विरोध करण्याचा प्रयत्न केला.तेव्हा झटापटीत सौ.चैताली या रस्त्यावर पडून गंभीर जखमी होवून त्यातच त्या मयत झाल्या. रात्री - ११ -२० च्या सुमारास हा प्रकार घडला.या घटनेने गंठणचोर किती निर्दयी झालेत हे समोर आले आहे.
या प्रकरणी मयत चैताली यांचे पती प्रदिप तागडकर यांनी सुपा पोलीसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात दोघा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०९ (५),१०५ प्रमाणे रस्ता लुट व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सपोनि दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई नागरगोजे हे घेत आहेत.या घटनेने गंठण चोरांविषायी नागरीकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे .