शिवप्रहार न्यूज- श्री क्षेत्र वेरुळ येथे महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांकडून “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या अठरापगड जातीच्या हिंदुत्वाच्या विचारांचा पुष्पवृष्टी करून सन्मान…

श्री क्षेत्र वेरुळ येथे महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांकडून “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या अठरापगड जातीच्या हिंदुत्वाच्या विचारांचा पुष्पवृष्टी करून सन्मान…
संभाजीनगर - संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील श्री क्षेत्र वेरुळ येथे जय बाबाजी भक्त परिवाराकडून “धर्मसंस्कार महासप्ताह सोहळा”आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमात काल दिनांक 14 डिसेंबर रोजी “शिवप्रहार प्रतिष्ठान” चे प्रमुख मा.पोलीस अधिकारी श्री.सुरजभाई आगे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेला अठरापगड जातीचा,हिंदू समाजाला एक करणारा हिंदुत्वाचा विचार मांडत असताना संत जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर,१००८,श्री.शांतिगिरीजी महाराज यांनी उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी केली.यातुन त्यांनी “शिवप्रहार प्रतिष्ठान”करत असलेल्या कार्याचा व शिवप्रहार प्रतिष्ठानच्या हिंदुत्वाच्या विचारांचा सन्मान केला.
तसेच यावेळी नागेश्वर महाराज यांनी आहुती यज्ञ करून घेतला.त्यानंतर शांतिगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये महाआरतीचा सन्मान देखील “शिवप्रहार प्रतिष्ठान”ला देण्यात आला.शिवप्रहार प्रतिष्ठान ची विचारधारा ऐकल्यानंतर महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांनी त्यांच्या निवासस्थानी(कुपी)सविस्तर चर्चा करून शिवछत्रपतींच्या मूळ विचारांवर चालु असलेले शिवप्रहारचे कार्य जाणून घेतले व या कार्याला पूर्ण पाठिंबा दर्शविला.
यावेळी श्री.नागेश्वर महाराज, संपादक मयूर फिंपाळे,राहुल अस्वले, भाऊराव जगताप,योगेश सोनार,दीपक संत,अभिजीत खैरे,पटारेकाका,पडोळेमामा यांच्यासह इतर मावळे उपस्थित होते.
या सप्ताह सोहळ्याचे विशेष म्हणजे श्री.क्षेत्र वेरुळ व श्री.क्षेत्र ओझर या दोन्ही ठिकाणी हा सोहळा चालू असून महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज हे हेलिकॉप्टरद्वारे प्रवास करून दोन्ही ठिकाणी भक्तांना मार्गदर्शन करतात.दोन्ही मिळुन दररोज एकूण 25 हजारांचा जनसमुदाय या सोहळ्यामध्ये सहभागी झालेला असतो.