शिवप्रहार न्युज - नेवासारोडला अपघातात ०१ ठार…

नेवासारोडला अपघातात ०१ ठार…
श्रीरामपूर (प्रतिनिधी)-वडाळामहादेव येथे असलेल्या अजितदादा पवार कॉलेजसमोर आज दि.२१ मे रोजी बुधवारी दुपारच्या सुमारास अपघात होवून एकाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडाळामहादेव येथील अजितदादा पवार कॉलेजसमोर असलेल्या श्रीरामपूर-नेवासा रोडवर स्पीड ब्रेकरजवळ भोकर येथील एकजण त्यांच्याकडील हिरो होन्डा कंपनीची मोटारसायकलवरून भोकरहून श्रीरामपूरच्या दिशेने चालले होते.त्याच्या दुचाकीची आणि एका चारचाकी वाहनाची धडक होवून हा अपघात घडला आहे. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील इसमाचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान या घटनेची माहिती शिवप्रहारचे समन्वयक अभिजीत खैरे यांनी तातडीने पोलीस प्रशासनास देवून ॲम्ब्युलन्स बोलावण्सास मदत केली. मयत इसमाचे नाव नारायण ढाले,भोकर
असे असल्याचे समजते.